औरंंगाबाद : तुझा वराहाचा (डुकरांचा) व्यवसाय माझ्या जीवावर चालत असून मला दरमहा ५० हजार रूपये खंडणी दे असे म्हणत चार जणांनी वराहाचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यास शिवीगाळ करून माहराण केली. मारहाण्ीादरम्यान व्यापाऱ्याच्या खिशातील २ लाख रूपये मारहाण करणाऱ्यांनी लांबविले असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश भानुदास गायकवाड (वय ३२, रा.भावसिंगपुरा) यांचा वराह पालनाचा व्यवसाय आहे. २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश गायकवाड हे पडेगाव परिसरातील धरमकांटा येथे असतांना संपत कचरू जाधव (रा.मिटमिटा) हे आपल्या तीन साथीदारासह त्या ठिकाणी आले.
यावेळी संपत जाधव यांनी सुरेश गायकवाड यांना तुमचा वरहाचा व्यवसाय माझ्या जीवावर चालत असून मला दरमहा ५० हजार रूपये खंडणी द्या म्हणून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यावेळी संपत जाधव यांच्यासोबत असलेल्या एकाने गायकवाड यांना तलवारीने मारहाण केली. मारहाणी दरम्यान गायकवाड यांच्या खिशातील २ लाख रूपये खाली पडले असता, मारहाण करणाऱ्यांनी ते पैसे लांबवले. याप्रकरणी सुरेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून संपत जाधव व त्यांच्या तीन साथीदाराविरूध्द छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात अकराव्या दिवशी रेकॉर्ड तुटला; कोरोनामुक्तांपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या अधिक !
- औरंगाबादेत जगण्याच्या विवंचनेत सापडलेले मनपा कर्मचारी साजरा करणार ‘आर्थिक शोषण दिन’!
- पुरेशा लससाठ्या अभावी उद्यापासून तीन दिवस मुंबईत लसीकरण बंद
- परभणी जिल्ह्यात गुरूवारी १२६५ जण कोरोना बाधित; २१ रुग्णांचा मृत्यू
- नगरसेवकांनी तारतम्य ठेवणं गरजेचं; मनसे नगरसेवकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाघ यांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
