🕒 1 min read
पुणे : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत होता. पुणे शहरात सलग दहा दिवस नव्या कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांचा आकडा हा अधिक असल्याची नोंद करण्यात येत होती. मात्र, गुरुवारी अकराव्या दिवशी हा रेकॉर्ड तुटला आहे. आज कोरोनामुक्तांपेक्षा कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे.
‘पुणे शहरात आज नव्याने ४ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख १५ हजार ३९९ इतकी झाली आहे. तर, ४ हजार ६८८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ६४ हजार ४६४ झाली आहे.’ अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. येणारे काही दिवस पुणे शहरासाठी महत्वाचे असल्याने नागरिकांनी योग्य खबरदारी व नियमांचे पालन करावे असं आवाहन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका, डॉक्टरांच्या संपर्कात राहून रुग्ण घरीच बरे होतात’
- लष्करप्रमुख-पंतप्रधानांची भेट; लष्कराची रुग्णालये आता सामान्य नागरिकांसाठी खुली
- पश्चिम बंगाल : एक्झिट पोलमध्ये भाजपची मुसंडी तर ममतादीदींच्या जागा घटल्या, मात्र सत्ता…
- पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीसांसह दरेकरांवर गुन्हा दाखल करा; एसआयटी नेमा : भाई जगताप
- नगरसेवकांनी तारतम्य ठेवणं गरजेचं; मनसे नगरसेवकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाघ यांची प्रतिक्रिया

