पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
पुण्यात आरोग्य सेवांवर प्रचंड ताण निर्माण झाला असून रुग्णांसाठी बेड मिळवण्यासाठी नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अत्यावस्थ रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड यासोबतच रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णाचे नातेवाईक हतबलता व्यक्त करत असून सोशल मीडियाद्वारे तरुण पिढी पडतीसाठी पुढाकार घेत आहे. मात्र, यामध्ये देखील काही मर्यादा येत असल्याने रुग्णांचे प्राण जात आहेत.
दरम्यान, पुण्यातील मनसे नेते व नगरसेवक वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा रौद्रावतार धारण करत रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून महापालिका अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. यावेळी महिला अधिकाऱ्यासोबत त्यांची शाब्दिक चकमक देखील झाली. ‘आम्ही आमच्या घरच्यांसाठी मागतोय काय? आमची लोकं मरायला लागलीत तरी? कुठवर तुम्ही जीआर दाखवणार? एक नगरसेवक काम करतोय, तर त्याला सपोर्ट करायचा सोडून तुम्ही त्याला बाहेर खेचता’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला होता.
यावेळी महिला अधिकाऱ्याने मोबाईलकडे बोट करून कॅमेरा बंद करण्यास सांगितले. मोरे म्हणाले, ‘नाही बंद करणार, माझा हक्क आहे तो.’ यावर, ‘एका स्त्रीचे फोटो घेण्याआधी तुम्ही परवानगी घेतलीत का?’ असा प्रतिप्रश्न महिला अधिकाऱ्याने केला असता आपण फेसबुक लाईव्ह करत असल्याचं मोरेंनी सांगितलं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नगरसेवकांच्या वर्तणुकीवरून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या त्यामुळे मोठ्याप्रमाणात आरोग्य यंत्रणेवर तसेच लोकप्रतिनिधींवर ही कामाचा ताण असतांना दोघांनीही सांमजस्याची भुमिका घेत काम करणे आवश्यक
तसेचं अधिकार्यांशी वागतांना तारतम्य ठेवणे हि गरजेचे तशी समज मा.महापौरांनी सर्व नगरसेवकांना द्यावी @mohol_murlidhar— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 29, 2021
‘कोरोना रुग्णांची वाढती संख्या त्यामुळे मोठ्याप्रमाणात आरोग्य यंत्रणेवर तसेच लोकप्रतिनिधींवर ही कामाचा ताण आहे. दोघांनीही सांमजस्याची भुमिका घेत काम करणे आवश्यक तसेचं अधिकाऱ्यांशी वागताना तारतम्य ठेवणे हि गरजेचे तशी समज महापौरांनी सर्व नगरसेवकांना द्यावी,’ असं चित्रा वाघ म्हटल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘घाबरुन उगाच इकडे तिकडे पळापळ करु नका, डॉक्टरांच्या संपर्कात राहून रुग्ण घरीच बरे होतात’
- लष्करप्रमुख-पंतप्रधानांची भेट; लष्कराची रुग्णालये आता सामान्य नागरिकांसाठी खुली
- पश्चिम बंगाल : एक्झिट पोलमध्ये भाजपची मुसंडी तर ममतादीदींच्या जागा घटल्या, मात्र सत्ता…
- पोलिसांना धमकावल्याप्रकरणी फडणवीसांसह दरेकरांवर गुन्हा दाखल करा; एसआयटी नेमा : भाई जगताप
- ‘उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर सणसणीत ताशेरे मारलेत, आता तरी उद्धव ठाकरे घराबाहेर पडणार का ?’

