Share

उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटेमध्ये अनेक सर्वसामन्यांप्रमाणे बड्या राज्यकर्त्यांनादेखील विळखा घातला आहे. काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांच्यावर कोरोनाचे उपचार देखील चालू होते.

परंतु आज सकाळी १० वाजता एकनाथ गायकवाड यांचं दु:खद निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ गायकवाड हे महाविकास आघाडीतील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.

दरम्यान, गायकवाड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार महाले, माजी खासदार सन्माननीय एकनाथराव गायकवाड साहेबांच्या निधनानं समाजातील वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांसाठी लढणारा हक्काचा माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. एकनाथराव गायकवाड साहेबांचे नेतृत्व समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचलेलं, सर्वमान्य नेतृत्व होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रगाढ निष्ठा आणि काँग्रेसच्या विचारधारेशी ते जीवनभर प्रामाणिक राहिले. त्यांचं निधन ही समाजातील पुरोगामी, सुधारणावादी चळवळीची मोठी हानी आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ज्येष्ठ मार्गदर्शक गमावला आहे. आम्ही सर्वजण गायकवाड साहेबांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!