🕒 1 min read
परभणी : जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत १ मे पर्यंत ५० बेडचे आयसीयु सेंटर उभारणी करुन ते कार्यान्वित देखील करण्यात येणार आहे. कोरोनाबाधित रुग्णांकरिता या इमारतीत दोन मजल्यांवर जवळपास ४०० वर बेड्स उपलब्ध आहेत. या बरोबर ऑक्सिजनची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
जि. प. च्या नवीन इमारतीत आपत्कालीन स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी ५० बेडचे आयसीयू सेंटर्स उभारले जाणार आहे. १ मे रोजी हे सेंटर कार्यान्वित होईल, असा अंदाज आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात सोमवारी रात्री आयोजित केलेल्या आढावा बैठकीत या आयसी यु सेंटरसंदर्भात प्रामुख्याने चर्चा झाली. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीत आपत्कालीन स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना अन्यत्र हलविण्याऐवजी तात्काळ उपचाराकरीता आयसीयु सेंटर्स उभारले जावे, अशी सूचना केली होती. त्या दृष्टीने युध्दपातळीवर प्रयत्न करा, असा सल्ला दिला.
या सेंटरर्स उभारणीकरीता पैसा कमी पडल्यास तो आपण उपलब्ध करुन देवू, अशीही ग्वाही देखील खासदार जाधव यांनी दिली होती. या सूचनेची जिल्हा प्रशासनाने व जिल्हा रुग्णालयाने दखल घेतली. परभणी शहरासह जिल्हाभरामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण खुप वाढत आहे. त्यामुळे कोराेना रुग्णांना ऑक्सिजन, लसीकरण, औषधोपचार, रेमिडिसिविर सह अनेक सुविधा या वेळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना या ५० बेडचे आयसीयू सेंटरच्या माध्यमातून सर्व रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
- दिलासा कायम : पुण्यात आजही नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक !
- आनंदाची बातमी! रशियन लस ‘स्पुतनिक-व्ही’ १ मे रोजी भारतात होणार दाखल
- विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेवर आपले बेगडी प्रेम दाखवू नये, रेमडेसिविरवरुन आ.सतिश चव्हाणांचा फडणवीसांना टोला!
- ‘हवं तर भाजपच्याच लोकांना रेमडेसिविर द्या, पण..’ हसन मुश्रीफांचे मोदींना साकडे
- ऑक्सिजन दुर्घटना टाळण्यासाठी ‘नंदुरबार पॅटर्न’ राबवा; आरोग्यमंत्री टोपेंचे सक्त आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
