नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही राज्यांमध्ये महामारीचा उद्रेक झाला आहे. विशेषत: दिल्ली, महाराष्ट्रामध्ये कोरोना स्थिती गंभीर बनली आहे. राजधानी दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. लोकांना बेड्स मिळत नाहीत. एकंदरीत आरोग्य सुविधा तोकड्या पडत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यातच आता दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाची टिपण्णी केली आहे. अरविंद केजरीवाल सरकारची सर्व सिस्टिम फेल ठरली आहे. राज्यात ऑक्सिजन सिलिंडरचा आणि कोरोनाविरोधात लढण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या औषधांचा काळाबाजार होत आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी. त्यांना हे जमत नसेल, तर आम्ही केंद्र सरकारला सर्वकाही हातात घेण्याचे निर्देश देऊ, असं दिल्ली हायकोर्टाने म्हटलं आहे.
कोरोनाच्या प्रसाराने आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याने बेहाल झालेल्या नवी दिल्लीला मंगळवारी थोडा दिलासा मिळाला. चार टँकरमधून ७० टन प्राणवायू वाहून आणणाऱ्या ऑक्सिजन एक्स्प्रेसचे आगमन आज सकाळी राजधानीत झाले. हा ऑक्सिजन दिल्ली सरकारतर्फे विविध रुग्णालयांना पुरविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय आणखी मदतीसाठी प्रयत्न सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदीजी पाहा! बैठकीत मास्क न घातल्याने थायलंडच्या पंतप्रधानांना १४ हजारांचा दंड
- घाटीत निवासी महिला डॉक्टरला मारहाण करणारा गजाआड
- परमबीर सिंह गोत्यात ? अंडरवर्ल्डशी संबंध ते सोन्याची बिस्किटे, पोलीस अधिकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप
- प्रेम विरहातून युवकाची रेल्वे समोर आत्महत्या
- ‘हमने तो जलने का हुनर भी तुफानों से सीखा है’, आनंद महिंद्रांची कोरोना योद्ध्यांना अनोखी सलामी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
