🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात लॉकडाऊन काळातही विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना पकडून अँटिजेन तपासणी करत आहेत. नियुक्त पथकांनी गुरुवारी (दि. 2७) दिवसभरात ११७ जणांची कोरोना चाचणी केली. त्यातून सात जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून संबंधितांना लगेच विविध कोविड केअर सेंटर्समध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले.
शहरात दररोज दिड हजारांच्या घरात कोरोना रुग्ण निघत आहेत. शहरातील अनेक भाग हॉटस्पॉट म्हणून जाहिर केले आहेत. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात १४ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून संचारबंदी लागू केली आहे. मात्र संचारबंदीतही रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी होती. कुठलेही योग्य कारण नसतांना संचारबंदीतही अनेक जण रस्त्यावर फिरतांना दिसून आले. त्यामुळे आता नाहक फिरणाऱ्यांवर चोप बसावा यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोबाईल व्हॅनद्वारे कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील चौकाचौकांमध्ये बेजबाबदारांना पकडून मोबाईल व्हॅनमध्ये कोरोना तपासणी करण्यात येत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आता मोबाईल व्हॅनची नजर असणार आहे. मनपा आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने बेजबाबदार नागरिकांविरोधात हे पाऊल उचलण्यात आले आहे. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विशाल पट्टेकर, स्मार्ट सिटीचे सिद्धार्थ बनसोडे, आरोग्य कर्मचारी, लॅब टेक्निशियन राबवित आहेत. मंगळवारी दिवसभरात ११७ नागरिकांची चाचणी करण्यात आली. यात ७ नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दिलासा कायम : पुण्यात आजही नव्या कोरोना रुग्णांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक !
- आनंदाची बातमी! रशियन लस ‘स्पुतनिक-व्ही’ १ मे रोजी भारतात होणार दाखल
- विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेवर आपले बेगडी प्रेम दाखवू नये, रेमडेसिविरवरुन आ.सतिश चव्हाणांचा फडणवीसांना टोला!
- परभणीमध्ये नातेवाईक ठरताहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर, रुग्णालय प्रशासन हतबल
- ऑक्सिजन दुर्घटना टाळण्यासाठी ‘नंदुरबार पॅटर्न’ राबवा; आरोग्यमंत्री टोपेंचे सक्त आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
