🕒 1 min read
परभणी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालय, आयटीआयसह जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत कोविड सेंटर्सवर आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचे कवडीचे नियंत्रण राहिले नाही. कोविड सेंटरवर अक्षरशः जत्रा भरल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या बेडवर औषधोपचार, डब्ब्यांच्या निमित्ताने त्यांचे नातलग तासनतास ठाण मांडून बसत आहेत. त्यामुळे हेच नातेवाईक कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे.
संपूर्ण शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढलेला दिसून येत आहे. विशेषतः होम आयसोलेशनवर सोमवारी ५ हजार ७८ एवढे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील बहुतांशी कोरोनाबाधित खऱ्या अर्थाने काळजी घेत आहेत, परंतू त्यातील काही बाधितांनी ४ – ६ दिवसातच मुक्तपणे संचार सुरु केला आहे. होमआयसोलेशनमध्ये असणारे दूर कोविड सेंटरर्सवर उपचार घेणारे रुग्ण व त्यांचे कुटूंबीय
या बाबत प्रश्न देखील उपस्थित करत आहेत. परभणीतील जिल्हा शासकीय रुग्णालय, आयटीआय, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत मोठ्या प्रमाणावर रुग्णांवर उपचार घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात २१९, आयटीआयमध्ये १६७ तसेच जिल्हा परिषद कोविड सेंटरवर २९० रुग्ण रुग्ण उपचार घेत आहेत.
परंतू या तीनही कोविड सेंटरर्सवर काही कोरोनाबाधित रुग्णांच्या बेड्सवर किंवा बेडच्या जवळ त्यांचे नातेवाईक ठाण मांडून बसत आहेत. जिल्हा परिषदेची नवीन इमारत व आयटीआयमध्ये हे चित्र सर्रासपणे पहावयास मिळत आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी चक्रावून गेले आहेत. कोविड सेंटर्समधून रुग्णांव्यतिरिक्त अन्य कोणीही प्रवेश करु नये, असे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. परंतु, कुटूंबीय, त्यांचे नातेवाईक कोणते तरी कारणे दाखवून रुग्णांच्या जवळ जाऊन सर्व नियम पायदळी तुडवत आहेत. त्यामुळेच वैद्यकीय अधिकारी खुप त्रस्त झाले आहेत. हेच कुटूंबीय व नातेगोते कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरत असल्याचे मत एका वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केले.
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
