Share

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आंदोलनाचा गिरीश महाजनांकडून समाचार

Published On: 

जळगाव : भाजप नेते तथा आमदार गिरीश महाजन पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. ते आता महिन्याभरानंतर मतदारसंघात परतलेत. आल्याबरोबर त्यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेत भाजपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने त्यांच्या विरुद्ध केलेल्या आंदोलनावर भाष्य केले.

जामनेर तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा गंभीर परिस्थितीतही तालुक्याचे आमदार गिरीश महाजन पश्चिम बंगालच्या निवडणुकीत व्यस्त होते. आमदारांच्या या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला होता. शिवाय ‘आमदार महाजन दाखवा अन् दहा लाख रूपये मिळवा’ असे आवाहन केले होते.

यावर आ.महाजन म्हणाले, पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने मी पश्चिम बंगालला गेलो होतो. त्यावेळी तालुक्यात परिस्थिती फारशी गंभीर नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती गंभीर झाली. मी तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो. मी नसलो तरी आमचे प्रामाणिक कार्यकर्ते रुग्णांच्या सेवेत होते. जिल्ह्यात विरोधकांचे एकही हेल्पलाईन सेंटर नाही किंवा आरोग्य सेवेसाठी कार्यकर्ते नाहीत. अशांनी आरोप करणे ही केवळ स्टंटबाजी आहे. आमची आरोग्य सेवा काय आहे हे नागरिकांना चांगलीच माहिती आहे, असे महाजन यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!