Share

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरून अमरावतीची बदनामी करू नका, आरोग्य विभागाचे आवाहन

Published On: 

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील कोरोनाच्या नव्या म्युटेन व्हेरियंटची सध्या राज्यासह देशभरात जोरदार चर्चा आहे. शहरातील नव्या व्हेरियंटमुळे देशात कोरोना वेगाने वाढत असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहे. अशाप्रकारे कोणीही अमरावतीची बदनामी करू नये. अमरावतीत नवा म्युटेन व्हेरियंट मिळाल्याची अधिकृत पुष्टी झाली नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी स्पष्ट केले आहे.

जानेवारी ते मार्चदरम्यान अमरावतीत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला नाही. यादरम्यान पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे येथून जेवढे नमुने पाठविण्यात आले होते. त्या सर्वांमध्ये जुनाच स्ट्रेन आढळला आहे. ज्यावेळी देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगात पसरायला लागली त्यावेळी केंद्र सरकारद्वारे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा शोध घेण्यासंदर्भात विविध शहरांमधील नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

याअंतर्गतच अमरावती जिल्ह्यातून एकूण ६० कोरोना रुग्णांचे नमुने पाठविण्यात आले होते. यात बहुतांश विदेशातून परतलेल्या नागरिकांचे हाते. या बाहेरून आलेल्या कोरोना रुग्णांना नव्या स्ट्रेनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले नव्हते. नुकत्याच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य पथकानेही नव्या स्ट्रेनबाबत कोणतीही माहिती दिली नाही. पुणे, हैदराबाद, दिल्ली येथे नवा स्ट्रेन आढळल्याची पुष्टी करण्यात आली. पण, यात अमरावतीचे नाव देण्यात आले नसल्याची माहिती जिल्हयाच्या आरोग्य विभागाद्वारे देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!