🕒 1 min read
मुंबई – नाशिक इथल्या झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी होती, मात्र आपले मनोबल खचू न देता चिकाटीने आपली सेवा देत राहा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या रूग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना सांगितलं.
नाशिक विभागातील सर्व रूग्णालयांचं अग्निप्रतिबंधक, बांधकाम तसंच विद्युत उपकरणांचंही ऑडिट लवकरात लवकर करा. तसेच यापुढे अशी दुर्घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
पावसाळा, वादळ यादृष्टीनंही उपाययोजना करून घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेनंतर तिथे काम करणारे डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या रुग्णालयातील कामकाजाविषयी सविस्तर माहिती यावेळी मुख्यमंत्री यांना सादर केली.
महत्त्वाच्या बातम्या
- सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचं पाणी पळविल्याची विरोधकांनी वावडी उठविली – भरणे
- ठरलं ! राज्यात १८ वर्षांपुढील व्यक्तींचे मोफत लसीकरण; जितेंद्र आव्हाडांची माहिती
- नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोनाची दांडी ? ज्ञान पाजळणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई होणार का ?
- ज्याच्यासाठी कमावलं तोच कोरोनाने हिरावला; वृद्ध दाम्पत्य FD मोडून करतंय कोरोना रुग्णांना मदत
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
