Share

ठरलं ! राज्यात १८ वर्षांपुढील व्यक्तींचे मोफत लसीकरण; जितेंद्र आव्हाडांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.

दरम्यान, १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांसाठी देखील लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. अशातच अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी लसींचे नवे दर जाहीर केले आहेत. आधीच आर्थिक पेचात असलेले नागरिक नव्या किंमतींमुळे अधिक पेचात पडले असून लसीकरणामध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने मोफत लस देण्याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1386298231856893955?s=20

आता, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात मोफत लसीकरण होणार असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. ‘महाविकास आघाडीने राज्यातील जनतेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता १८ ते ४५ वय वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस राज्य सरकार देणार असून याचा प्रारंभ महाराष्ट्र दिनापासून अर्थात १ मे पासून करण्यात येणार आहे धन्यवाद..’ असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!