Share

जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर, देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले.

सीबीआयच्या या कारवाईवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी संशय व्यक्त केला असून भाजपने मात्र सीबीआयच्या कारवाईच स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी यांनी सीबीआयच्या कारवाईवर शंका उपस्थित करत देशात मोघलाई आल्याचं वाटत असल्याची टीका केली आहे. ‘सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. धाड टाकल्यानंतर जे आक्षेपार्ह वाटलं असेल ते तिथेच जनतेसमोर आणायला हवं. प्राथमिक चौकशीचा निष्कर्ष कळण्याआधीच धाड घालुन आणि बाहेरचे सामान-वस्तू आत घेऊन जाण्याची घटना घडली आहे.’ असं भाष्य जयंत पाटील यांनी केलं होतं.

जयंत पाटील यांच्या या विधानाचा भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं घरात कोण जातं आणि कोण येतं हे वॉचमनशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घरचे वॉचमन असावेत,’ असा खोचक टोला देखील निलेश राणेंनी लगावला आहे. आज त्यांनी माद्यांशी संवाद साधताना ही टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!