Share

‘गडबड’ केली म्हणून सीबीआय आली, आता ‘बडबड’ न करता न्यायालयाचा आदेश वाचा – चित्रा वाघ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, आता सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते टीका करू लागले आहेत तर भाजप नेते या कारवाईचे स्वागत करताना दिसून येत आहेत. महाविकास आघाडीतील नेते सीबीआयच्या कारवाईवर संशय व्यक्त करत असताना आता भाजप नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी बडबड न करता आधी न्यायालयाचे आदेश नीट वाचावे, असा सल्ला दिला आहे. ‘ “गडबड” केली म्हणूनच CBI आली आणि आता “बडबड” न करता न्यायालयाचा आदेश व्यवस्थित वाचावा जेणेकरून न्यायव्यवस्थेची तर्कसंगतेचा आपणास बोध होईल,’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी न्यायालयाच्या आदेशाचा फोटो देखील शेअर केला आहे.

दरम्यान, खंडणी प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्या मालमात्तांवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सीबीआयने याप्रकरणी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!