🕒 1 min read
साष्टपिंपळगाव : गेल्या ९५ दिवसांपासून साष्टपिंपळगावात मराठा आरक्षणासह इतर मुख्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यासह देशभर पसरली आणि मरगळ आलेला मराठा समाज पुन्हा एकदा खडबडून उठला. बघता बघता या आंदोलनाची धग झपाट्याने राज्यभर पसरली. आणि सरकार खडबडून जागे झाले. गुरुवारी (दि.२२) जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी मध्यस्थी करत राज्य सरकारच्या वतीने साष्टपिंपळगाव आंदोलकांना ७ पैकी ४ मागण्या मान्य केल्याचे लेखीपत्र दिले आहे. हे लेखीपत्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसिलदार साष्टपिंपळगाव आंदोलन ठिकाणी घेऊन आले.
मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही असा प्रण केलेल्या ग्रामस्थांनी अखेर यश हे खेचून आणलेच. या आंदोलनात इतिहासतज्ञ, शिवव्याख्याते, राष्ट्रीय स्तरावरील शिवशाहीर, राज्यभरातील महंत मंडळी, राज्य समन्वयक, राज्यातील वकिल संघ, विविध सामाजिक संघटना, मराठा संघर्ष यात्रा, विविध राजकीय पक्ष, केंद्र गावची गावे हजारोंच्या संख्येने साष्टपिंपळगाव आंदोलन ठिकाणी येऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवून सामिल झाले होते.
या आंदोलनानुसार राज्यभर आंदोलन सुरू होते. ग्रामपंचायत कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन, गावागावात पायी रॅली, मोटारसायकल रॅली, तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन, गावागावात ठिय्या आंदोलन, जनजागृती फेरी असे भरगच्च कार्यक्रम राज्य सरकारवर दबाव वाढतच होते. साष्टपिंपळगाव आंदोलनामुळे महाराष्ट्रातील घराघरातून मराठा तरूण पेटून उठला होता. या चार मागण्यांमध्ये सारथी संस्थेला जागा, सारथीसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद, सारथीसाठी ४४ पदे भरणार, कै. आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधी आणि अध्यक्ष नियुक्ती या चार मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
राहिलेल्या मागण्यांना मंजूरी मिळत नाही तोपर्यंत समाधान नाही
सरकारने आमच्या चार मागण्या मान्य केल्या आहेत. तसे लेखीपत्र प्राप्त झाले आहे. आम्हाला यासाठी खूप लढावे लागले तेव्हा आमच्या मराठा आंदोलनाचा विजय झाला. आनंद तर आहेच परंतु जोपर्यंत टाईमबाँडनुसार यास मंजूरी मिळत नाही किंवा प्रत्यक्ष कार्यवाही होत नाही, तोपर्यंत वाट बघावी लागेल. कामकाज सुरू होईपर्यंत सरकारवर विश्वास तर ठेवावा लागणार आणि आमच्या राहिलेल्या मागण्यांना मंजूरी मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान मिळणार नाही.
–मनोज जरांगे पाटिल
महत्त्वाच्या बातम्या
- अकरा राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, मोदींनी केल्या ‘या’ सुचना
- कासार येथील दुकानदाराला दुकान उघडे ठेवणे पडले महागात
- कोरोनाच्या तणावात प्रशासनाचे जलपर्णीकडे दुर्लक्ष; इतर आजारांना मिळतंय खुलं निमंत्रण
- सेलूत प्रभू श्रीराम अन्नछत्र उपक्रम सुरु, गरजुंना मिळणार घरपोच लाभ
- कोरोना बाधितांनी घरीच उपचार घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
