Share

सेलूत प्रभू श्रीराम अन्नछत्र उपक्रम सुरु, गरजुंना मिळणार घरपोच लाभ

Published On: 

परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात लॉकडाऊनच्या तसेच संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गरजू कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालावा, या दृष्टीने येथील श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे २११ गरजू कुटूंबियांना ३० दिवस पुरेल एवढे धान्याचे कीट नुकतेच वितरत केले आहे. या माध्यमातून गरिब आणि गरजुंना जेवनाची व्यायनव माध्यमातून लाभ मिळणार आहे.

श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे गेल्या पाच वर्षांपासून सेलू शहरात दरवर्षी भव्य शोभायात्रेचे आयोजन केल्या जात आले आहे, परंतु मागील वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शोभायात्रा रद्द करावी लागली. यावर्षीसुध्दा शोभायात्रा रद्द केली. परंतु, समितीने यावर्षी गरजवंतांसाठी प्रभू श्रीराम अन्नछत्र हा अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला. त्याप्रमाणे श्रीरामनवमीचे औचित्य साधून श्रीराम भक्तांच्या व समितीच्या सहकार्यातून २११ गरजू कुटूंबियांना ३० दिवस पुरेल एवढे धान्य वितरित केले.

उपजिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, वैद्यकीय अधिक्षक यांच्याहस्ते या वेळी धान्यांच्या कीटचे वितरण करण्यात आले. दरम्यान, समितीतर्फे गरजवंत कुटूंबियांना घरपोच धान्य सामुग्री वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी समिती सदस्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!