Share

कासार येथील दुकानदाराला दुकान उघडे ठेवणे पडले महागात

Published On: 

लातूर: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र कडक निर्बंधांसह संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सगळंच बंद ठेवण्यात आलं आहे. किरण दुकान देखील सकाळच्या वेळेतच उघडे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरी काही नागरिक नियमांचं उल्लंघन करत असल्याचे दिसत आहेत. असाच प्रकार कासार येथे घडला आहे, एका दुकानदाराने कोरोना तसेच शासनाचे नियम पायदळी तुडवत दुकान सुरु ठेवले होते.

कासार शिरसी येथे कोव्हीड १९ चे नियम डावलून व जिल्हाधिकारी यांच्या नियमांचे उल्लंघन करून किराणा दुकान चालू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासार शिरसी पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रेवनाथ डमाळे व त्यांचे सहकारी गावात गस्त घालत असताना शिवाजी चौक ते हनुमान मंदिर रोडवर एक किराणा दुकान चालू असल्याचे निदर्शनास आले.

दुकानाचे एक शटर बंद व दूसरे शटर चालू ठेऊन आत मध्ये ग्राहकांना घेऊन किराणा मालाची विक्री करत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलीसांनी ग्रामविकास अधिकारी हणमंत ढोले, यांना बोलावून घेतले असता त्यांनी स्पष्ट सांगितले की यापूर्वी यांना मास्क न लावता माल विक्री करत असल्याचा दंड केला आहे व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करण्याची नोटीस बजावली आहे. तरी दुकान चालू होते. यावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे व्यापारी संतोष बोळशट्टे यांनी उल्लंघन केले असून, याप्रकरणी सपोनि डमाळे यांच्या फिर्यादीवरून व्यापारी संतोष बोळशट्टे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!