🕒 1 min read
पुणे : शहरांची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वच सेवांवर अधिकचा भार वाढत आहे, राज्यातील पुणे-मुंबईसारखी शहरं याचेच उदाहरण आहेत. दरम्यान, जितकी जास्त लोकसंख्या तितके जास्त प्रदूषण, कचरा. याचाच ताण स्थानिक प्रशासनावर पडत आहे. दरम्यान, याचा विपरीत परिणाम हा शहरांमधील नद्यांमध्ये होत आहे.
कधी काळी स्वच्छ वाहणाऱ्या पुण्यातील नद्या देखील याच प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांसाठी कोट्यवधींच्या निधींची घोषणा करण्यात आली, देश-विदेशातील संस्थांद्वारे पुढाकाराने विविध उपक्रम हाती घेतले गेले. मात्र, या नद्यांवर त्याचा काही एक परिणाम झालेला नाही.
सध्या प्रशासनावर कोरोनाचा ताण असल्याने इतर सुविधा पुरवण्यात काहीसं अपयश येत आहे. कोरोनाचा आजार पुन्हा एकदा बळावला असतानाच नद्या-तलाव यांमधील जलपर्णी ही डासांची उत्पत्ती करण्यासह अनेक आजारांना निमंत्रण देत आहे.
सुमारे तीन आठवड्यांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा आढावा बैठकीत जलपर्णी काढण्यासाठीच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. ‘पुणे जिल्ह्यामधील मुळा-मुठा, भीमा, पवना नदीपात्रातील जलपर्णीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी या नद्यांतील जलपर्णी काढण्यासाठी तत्काळ नियोजन करावे. यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत,’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती.
मात्र, यानंतर कोरोनाचा विस्फोट व प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाल्याने जलपर्णी काढण्याच्या कामास दुर्लक्षित केलं जात असल्याचं दिसून येत आहे. पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील नद्यांमध्ये जलपर्णीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे नदी जवळील भागातील स्थानिकांच्या जीवाला अनेक आजारांच्या समस्या उद्भवत असून कोरोनाच्या धोक्याने त्यांच्यावर इलाज करण्यात देखील अडथळा येत आहे.
सांगवी-औंध भागात मुळा नदी ही पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीचे विभाजन करते. याच भागात नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली असून जलचरांना देखील धोका निर्माण झाला आहे. डासांचा वाढता धोका व त्यामुळे आजार फोफावण्याची शक्यता लक्षात घेता या भागातील जलपर्णी तातडीने काढण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे सावरतंय ! सलग पाचव्या दिवशी कोरोनमुक्तांची संख्या अधिक, आता ‘ढिलाई’ नकोच
- बिहारमध्ये जीप गंगा नदीत कोसळून दहा प्रवाशांना जलसमाधी
- आजच्या सामन्यात कृणाल पांड्या दीपक हुडाच्या निशानावर; त्या अपमानाचा बदला घेण्याची शक्यता
- वेळीच काँग्रेस नेत्यांचे सल्ले ऐकले असते तर देशाचे स्मशान झाले नसते – पटोले
- फरार बाबा नित्यानंदच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास मनाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
