Share

अकरा राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, मोदींनी केल्या ‘या’ सुचना

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती बिकट झाली आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिक रुग्णसंख्या असलेल्या ११ राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. ऑनलाईन बैठकीत पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन, लसीकरण, औषधांचा काळाबाजार अशा बऱ्याच मुद्द्यांवर प्रकाश टाकला. या बैठकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूतील मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला.

परस्पर सहकार्याने ऑक्सिजनची गरज भागवा
ऑनलाईन बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनबद्दल विचारणा केली. यावर मोदींनी ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या औद्योगिक क्षेत्राचा ऑक्सिजन गरज भागवण्यासाठी वळवण्यात आल्याचेही स्पष्ट केले. सर्व राज्यांनी परस्पर सहकार्यानं औषधं आणि ऑक्सिजनची गरज भागवावी. कोणत्याही राज्याने ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना कुठेही अडवू नये किंवा त्यांना वेठीस धरू नये असेही मोदी म्हणाले.

ऑक्सिजनसाठी हवाई दलाची मदत
वेगवेगळ्या रुग्णालयांत ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तेथील राज्यांनी एक उच्चस्तरीय समितीची नेमणूक करावी असे पंतप्रधानांनी सुचवले. ही समिती केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या ऑक्सिजनचं गरजेप्रमाणे रुग्णालयांमध्ये वाटप करेल. ऑक्सिजन पुरवठ्याच्या संदर्भातला प्रवासातला वेळ कमी करण्याचे प्रयत्नही सुरूयेत. रेल्वेकडून ऑक्सिजन एक्सप्रेस सुरु करण्यात आली असून ऑक्सिजन पुरवठ्यासाठी हवाई दलाचीही मदत घेणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलं.

लसीकरण मोहिमेवर अधिक भर
सध्याच्या स्थितीत लसीकरणाचा वेग कमी व्हायला नको. आजमितीला भारत जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. भारत सरकारने १५ कोटींहून अधिक लसी राज्यांना मोफत दिल्याचे सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्यांना लसीकरण मोहिमेवर अधिक भर देण्यास सांगितलं आहे.

सुरक्षेबद्दलची सर्व खबरदारी घ्या
रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षेबद्दलची सर्व खबरदारी घ्यावी असे आवाहन मोदींनी केले. त्यांनी देशातल्या ऑक्सिजन गळती दुर्घटना आणि रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. केंद्र सरकारचा राज्यांना या लढाईत पूर्ण पाठिंबा असेल. आरोग्य मंत्रालय सर्व राज्यातल्या परिस्थितीवर बारीक लक्ष असल्याचे मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!