नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची आणि बळींची संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. देशात जवळपास सर्वच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर यांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. मात्र, अशातच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रुग्णांना घरीच उपचार घेण्याचे आवाहन केले आहे.
या संदर्भात न्यूज एजन्सीने डॉ. हर्षवर्धन यांनी असे आवाहन केले असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ९८ ते ९९ टक्के रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरजच नसल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. अधिकाधिक रुग्ण हे घरीच बरे होवू शकतात आणि होत आहेत. गरज पडली तरच हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्लाही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी यामध्ये दिला आहे.
देशवासियों से मेरा निवेदन है कि सब धैर्य बनाकर रखे। जिसे ज़रूरत है वे ही अस्पताल जाए। 98-99% मरीजों को शायद अस्पताल जाने की ज़रूरत भी नहीं पड़ती है। वे घर में ही ठीक हो सकते हैं और अधिकांश मरीज घर में भी ठीक हो रहे हैं। ज़रूरत पड़ने पर ही अस्पताल जाएं: केंद्रीय स्वास्थ्य मंत्री pic.twitter.com/rvHX9BHmYt
— ANI_HindiNews (@AHindinews) April 23, 2021
देशात सध्या कोरोना बळींची संख्या झपाट्याने वाढत असताना केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे हे वक्तव्य धक्कादायक म्हणावे लागेल. कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच खासगी हॉस्पिटल तर रुग्णांकडून मनमानी पैसे वसूल करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे हे वक्तव्य निश्चितच विचार करायला लावणारे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांसमोर केजरीवालांना फटकारले, म्हणाले..
- अंडरवर्ल्डशी संबंध? पोलीस महासंचालकाकडून परमबीर सिंहांची चौकशी
- शासनाने जाहीर केलेली मदत आठ दिवसात पोहोचवणार – हसन मुश्रीफ
- रेमडिसीवीर नंतर औरंगाबादेत आता ‘या’ इंजेक्शनचा तुटवडा
- मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार


