Share

खंडाळा येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करा अशी मागणी खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव, यांनी केली आहेत. गुरूवारी दि.२२ वैजापूर – गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.रमेश बोरनारे यांना निवेदन देत राजेंद्र जानराव यांनी ही मागणी केली.

राज्य सरकारने गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी जनतेला शिवभोजन थाळी या नावाने अत्यल्प दरात भोजन उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्याचा फायदा हातावर पोट असलेल्या गरीब जनतेला मोठ्या प्रमाणात होत असुन शहरात सुरु असलेल्या या योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहेत. मात्र मोठी लोकसंख्या असलेल्या गावपातळीवर ग्रामिण भागात देखील हि योजना सुरु करुण गरीब जनतेचे पोट भरावे.

खंडाळा या गावात केंद्र सुरु करुन जनतेच्या पोटाची सोय करावी, वैजापूर तालुक्यातील खंडाळा हे मोठे गाव असुन जवळजवळ २० हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथील अनेक कुटुंब हे रोजंदारीवर काम करुन आपले पोट भरतात. मात्र सध्या कोरोना संकट असल्याने अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे गरीब मजुर कामगारांचा पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गोरगरिबांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी एक शिवभोजन केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जानराव यांनी आ.प्रा.रमेश बोरनारे यांना केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!