🕒 1 min read
बीड : बीड जिल्ह्यातील धारूर येथे एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. लहान मुलांना शिव्या द्यायचे का शिकवते, असे म्हणत एका महिलेचे जीपमधून सिनेस्टाइल अपहरण केल्याची घटना असोला येथे घडली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एक तरुण मंगळवारी दुपारी तो पत्नी व मुलांसोबत घरासमोर होता. यावेळी तेथे बाबासाहेब उत्तम सांगळे (रा.शिरुर), नीलेश विष्णू घोळवे व नितीन विष्णू घोळवे (दोघे रा.पिंपळगाव ता.बीड) हे आले. त्यांनी तरुणाच्या पत्नीला ‘तू लहान मुलांना शिव्या द्यायचे का शिकवते,’ अशी कुरापत काढून तिला शिवीगाळ करुन बळजबरीने जीपमध्ये टाकून अपहरण केले. पतीसमोरच हे अपहरणनाट्य घडले. पतीने आरडाओरड करुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यास दाबदडप केली.
दरम्यान, अपहरणकर्त्यांनी काही वेळाने महिलेच्या पतीला फोन करुन तुला व तुझ्या पत्नीला जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या घरासमोरून त्याच्या पत्नीस बोलेरो गाडी टाकून घेऊन गेले व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात आरोपी बाबासाहेब उत्तम सांगळे, निलेश विष्णू घोळवे, नितीन विष्णू घोळवे व विष्णू घोळवे (रा. पिंपळगाव) या चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाची दुसरी लाट मोदी निर्मित प्रकोप’, ममता बॅनर्जी यांचा घणाघात
- कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीला भाजप जबाबदार-पी.चिदंबरम
- जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ
- सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून
- केंद्रीय आरोग्य पथक आले अन् बाधित होऊन गेले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
