Share

जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ

Published On: 

लातूर : मराठवाड्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोरोनामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झालाय. काही जण कोरोनाने तर अनेकांनी कोरोनाची धास्ती घेतल्याने प्राण सोडल्याचे दिसून आलेय. केवळ बाधित झाल्याने भीतीने आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण लातूरच्या एका आजोबांनी सर्वांसमोर एक आदर्श तयार केलाय. औसा तालुक्यातील लोदगा येथील वय वर्षे १०५ असलेल्या जेष्ठ नागरिकाने कोरोनावर अवघ्या सात दिवसांत मात केली आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मकतेच्या बळावर त्यांनी कोरोनाला मागे टाकलेय.

धोंडीराम अंधारे असे या आजोबांचे नाव आहे. वयाची शंभरी ओलांडलेल्या धोंडीराम यांना गेल्या आठवड्यात खोकला, ताप अशी लक्षणे दिसून आली. त्यांनी कोरोना चाचणी केल्यावर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. वृद्ध नागरिकांसाठी कोरोनाचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली.

त्यांना लातूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कुटुंबीय भीतीग्रस्त असताना आजोबा मात्र खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह दिसून आले. १०५ वर्षाच्या कालखंडात त्यांनी अनेक संकटे, अडचणींवर मात केली होती. कोरोनासारख्या संकटावरही मात करूत हा आत्मविश्वास त्यांच्यात दिसून आला. या वयातही त्यांचा उत्साह, जिद्द पाहून रुग्णालयातील कर्मचारीही अवाक् झाले.

डॉक्टरांनी दिलेले औषधी ते नियमित घेत होते. शिवाय सर्व पथ्थ्यांचे त्यांनी योग्य पालन केले. आहार वेळेवर घेतला. सकारत्मता आणि योग्य उपचारामुळे धोंडीराम अंधारे यांनी कोरोनावर अवघ्या सात दिवसांवर मात करत आयुष्य पुन्हा प्रकाशमय केले. एकीकडे कोरोनामुळे तिशीच्या वयातील तरुण मृत्यूमुखी पडत असताना १०५ वर्षांच्या आजोबांनी सर्वांना कोरोनाविरोधात लढण्याचे बळ दिलेय हे मात्र खरे!

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!