Share

केंद्रीय आरोग्य पथक आले अन् बाधित होऊन गेले

Published On: 

सोलापूर : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन सदस्यांचे पथक सोलापूर दौऱ्यावर आले होते. पण पथकाच्या वाहनाचा चालक आणि एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने पाहणी दौरा कागदावरच राहिला. जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पथकातील सदस्यांना कोरोना झाल्याचे कळवले. पण त्यानंतर दुसरे पथक पाहणीसाठी आलेच नाही.

केंद्र शासनाने कोरोना परिस्थितीची पाहणी करणे व त्यावर उपाययोजना करण्यासाठी दोन सदस्यांचे पथक पाठवले होते. पण ज्या वाहनाने पथक आले होते त्या वाहनचालकाला कोरोनाचा संसर्ग झाला. दुसऱ्या दिवशी पथकातील सदस्य डॉ.ए.जी.आलोन यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दुसरे सदस्य पीयूष जैन यांना क्वारन्टाईन करण्यात आले. उपचारानंतर पथकातील दोन्ही सदस्य आल्या पावली परत गेले. दुसरे पथक येणार असल्याचे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात पथक आलेच नाही.

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना स्थिती गंभीर असताना पथक पाहणी करणे, त्याचा केंद्र व राज्य शासनाला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. इतर जिल्ह्यात पथकाकडून पाहणी करून अहवाल सादर करण्यात आला, आणखी सोलापूर जिल्ह्यास पथकाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाकडे केंद्रीय पथक येणार का, याची विचारणा केली असता पथक येणार नसल्याचे सांगण्यात आले. शिवाय पथकाचे सदस्य बाधित निघाल्याने पाहणी करता आले नसल्याचे शासनाला कळवले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!