कोलकाता : देशात आलेली कोरोना महामारीची दुसरी लाट ही पूर्णपणे मोदी निर्मित प्रकोप आहे. या सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे देशात ही भयावर परिस्थिती निर्माण झाली आहे, असा घणाघात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. राज्याला मोदींच्या डबल इंजिनाच्या सरकारच्या गरज नसून बंगाली इंजिनाचे सरकारच राज्य चालवेल, असेही त्या म्हणाल्या. राज्यातील बहुतांशी सरकारी संस्था केंद्रीय सुरक्षा दलांनी ताब्यात घेतल्यामुळे कोविड केंद्रे उभारण्यात प्रशासनाला अडचणी येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी ममतांनी दक्षिण दिनाजपूरच्या बालुरघाटमध्ये प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांना कोरोना महामारीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत टीकेची झोड उठवली. कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर आहे. यासाठी पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. मी तर म्हणेन ही दुसरी लाट म्हणजे मोदी निर्मित प्रकोप आहे. देशात कोरोना लस उपलब्ध नाही, रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही, औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. या सरकारने कोणतेही नियोजन न करत कोरोनावरील लस, औषधे इतर देशांना निर्यात केले. पण आता आपल्यालाच परदेशातून आयात करावे लागत आहे, असे ममता म्हणाल्या.
पंतप्रधान मोदी बंगालच्या विकासासाठी डबल इंजिनच्या सरकारची गरज असल्याचे सांगत भाजपला निवडून देण्याचे आवाहन करत असतात. याला देखील ममतांनी प्रत्युत्तर दिले. बंगालला मोदींच्या डबल इंजिनची गरज नाही. बंगालचा कारभार गुजरातवरून किंवा दिल्लीवरून चालणार नाही. बंगालची जनताच बंगालचा कारभार चालवेल, असे ममता म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीला भाजप जबाबदार-पी.चिदंबरम
- जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ
- सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून
- केंद्रीय आरोग्य पथक आले अन् बाधित होऊन गेले
- ‘त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत राहशील बाळा’, पंकजा मुंडेंच्या पोस्टने सोशल मीडिया गहिवरला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

