नवी दिल्ली : देशात कोरोना महामारीमुळे आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. या आणीबाणीसाठी भाजप जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केला. आता संपूर्ण देशाचे भवितव्य पश्चिम बंगालच्या जनतेच्या हाती असून मतदानातून ते जनतेच्या भावना व्यक्त करतील, असा विश्वास चिदंबरम यांनी व्यक्त केला.
चिदंबरम यांनी ट्विटरवरून करत मोदी सरकारला लक्ष्य केले. सरकारची वाटचाल बरोबर आहे की नाही, हे दाखवून देण्यासाठी निवडणूक ही संधी असते. देशात सद्य:स्थितीला निर्माण झालेल्या आरोग्य आणीबाणीसाठी पूर्णपणे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि भाजप पक्ष जबाबदार आहे. भाजपला त्यांची चूक दाखवून देण्याची वेळ आली आहे. आज संपूर्ण देशाचे लक्ष बंगालच्या जनतेकडे लागले आहे. त्यामुळे बंगाली मतदारांनी आपल्या मतदानातून देशवासीयांच्या भावना व्यक्त कराव्यात, असे आवाहन चिदंबरम यांनी केले.
आजही जर आपली यंत्रणा कोरोनाचा सामना करण्यासाठी अपुरी पडत असेल तर गेल्या वर्षभरात सरकारने केले काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनच्या भीतीने स्थलांतरित मजूर गावी परतण्यासाठी बस-रेल्वे स्थानकांवर गर्दी करत आहेत. मजुरांची ही अवस्था हृदय पिळवटून टाकणारी आहे. पण रेल्वे प्रशासन म्हणतेय की, रेल्वे स्थानकांवर अजिबात गर्दी नाही. असे असेल तर मग काय रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेसाठी लोक लांबच लांब रांगा लावत आहेत काय? सरकार म्हणतेय लसीचा तुटवडा नाही, मग देशात रुग्णांचा तुटवडा आहे का? असे प्रश्न उपस्थित करत चिदंबरम यांनी सरकारला टोला लगावला.
महत्वाच्या बातम्या
- जिगरबाज! १०५ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचे फळ
- सायंकाळी विक्री बंद असल्याने लाखो लिटर दूध पडून
- केंद्रीय आरोग्य पथक आले अन् बाधित होऊन गेले
- ‘त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत राहशील बाळा’, पंकजा मुंडेंच्या पोस्टने सोशल मीडिया गहिवरला
- ‘प्रीतम मुंडेंनी त्यांचा खासदार निधी कोविड सेंटरसाठी वापरावा’, वंचितची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

