🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनामुळे शहरात दररोज मृत्यूंची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक मृत्यूंची संख्या देखील वाढली आहे. अंतिम संस्कारात आता लाकडांच्या वापरास बंदीची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे मृतांवरील अंत्यसंस्कारासाठी शहरातील स्मशानभुमींमध्ये लाकडांचाच अधिक वापर केला जात आहे. मोठ्या झाडांवर कुर्हाड चालवली जात आहे. त्यामुळे पर्यावरणावरचा र्हास होत असून वाढत्या प्रदुषणाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता अंत्यसंस्कारासाठी लाकडाचा वापर थांबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापुढे लगद्यापासून तयार होणार्या विटांचा वापर केला जाणार आहे. या विटांच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
हिंदू धर्माच्या पंरपरेनुसार मृतदेहाला अग्निडाग दिला जातो. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. मात्र यासाठी झाडांची कत्तल करून लाकडे आणली जातात. त्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत असून प्रदुषणात वाढ होत आहे. त्यामुळे पालिका आयुक्त पांडेय यांनी लाकडाचा वापर थांबविण्याच्या दृष्टीने पर्यायी व्यवस्था म्हणून लगद्यापासून तयार होणार्या विटांचा वापर अंत्यसंस्कारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात १६ स्मशानभुमीमध्ये मृतदेहावर अंतीम संस्कार केले जातात. त्यासाठी लाकडांचा वापर होत आहे.
सध्या कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. बाहेरच्या जिल्हयातील व बाहेरच्या गावातील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही त्यींच्यावर शहरातील स्मशानभुमीतच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे लाकडांचा वापरही वाढलेला आहे. लाकडाचा वापर पूर्णपणे थांबविण्यासाठी लगद्यापासून किंवा ऊस, सोयाबीन यापासून तयार होणार्या विटांचा (ब्रिक्वेटस) वापर केला जाणार आहे. यासाठी पालिकेने निविदा काढण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.
लाकडांसाठी होणारी बेसुमार वृक्षतोड थांबविण्याच्या दृष्टीने पालिकेने लाकडाच्या वापराऐवजी लगद्यापासून तयार होणार्या विटांचा उपयोग अंत्यसंस्कारासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. विटांच्या खरेदीसाठी लवकरच निविदा काढली जाणार आहे.
– सखाराम पानझडे, शहर अभियंता मनपा.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनावर जनजागृती करण्यासाठी क्रांती चौकात छत्रपती शिवरायांसह साक्षात अवतरले फुले-गांधी-आंबेडकर!
- ८१२ गावात ‘या’ गोष्टींमुळे एकही कोरोना बाधित नाही
- परभणीच्या ऑक्सिजन प्लांटचा कच्च्या मालाचा पुरवठा बंद, भाजपचा राज्य सरकारवर आरोप
- कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’: ममता बॅनर्जी
- औरंगाबादचा रिकव्हरी रेट ‘इतका’! प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
