औरंगाबाद : कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलतर्फे मंगळवारी (दि. २०) क्रांती चौक येथे विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यात चिमुकल्यांनी कोरोनाबाबत काळजी घेत नियम पाळण्याचे आवाहन शहरवासीयांना केले. विविध महापुरुषांची वेषभूषा करत चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. मात्र अनेक लोकांमध्ये अजूनही याचे गांभीर्य दिसून येत नाही. मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे आदी कारणांमुळे कोरोना वेगाने पसरत आहे. याच अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने लहान चिमुकल्या मुला-मुलींनी मंगळवारी क्रांती चौक येथे जनजागृती केली. औरंगाबाद जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष अतिश पितळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी लहान मुला-मुलींनी महापुरुषांचा वेश परिधान करून हातात कोरोनाबाबत संदेशाचे फलक घेऊन जनजागृती केली. या उपक्रमात शिवाजी महाराज म्हणून कृष्णा पितळे, महात्मा फुले म्हणून विराट लोळगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रणव लोळगे, महात्मा गांधी म्हणून साई काजळे आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले म्हणून आराध्या बेदरे या चिमुकल्यांनी वेशभूषा साकारली होती.
यावेळी कोरोनाबाबत विविध संदेश देण्यात आले. तसेच यावेळी येथे उपस्थित पोलीस कर्मचार्यांना पाणी बॉटल, बिस्कीट, मास्कचे वाटप करण्यात आले. उपायुक्त वानखेडे, पोलीस निरीक्षक दराडे, काँग्रेस सचिव रवींद्र काळे, जिल्हाध्यक्ष अतिश पितळे, निलेश आंबेवाडीकर, आदी मान्यवर व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादचा रिकव्हरी रेट ‘इतका’! प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा
- ‘ब्रेक दि चेन’मुळे स्कूल बस चालकांवर उपासमारीची वेळ
- ‘राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना ही किरकोळ घटना वाटते; आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो?’
- देशात ऑक्सिजनचा तुटवडा, टाटा पुन्हा आले धावून; थेट परदेशातून आयात केले २४ ऑक्सिजन कंटेनर
- प्रेम हे लय भारी! पत्नीच्या स्मरणार्थ ८३ वर्षीय तात्यांची शिरजगाव ते पंढरपूर पायी वारी

