चेन्नई : आयपीएलमध्ये मगंळवारी गतविजेते मुंबई इंडियन्स आणि गत उपविजेते दिल्ली कॅपीटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपीटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखुन पराभव केला. मुंबई इंडियन्सने दिलेले १३८ धावांचे अव्हान दिल्लीने १९.१ षटकात ४ गडी गमावून पार केले. दिल्लीकडून ४ गडी बाद करणाऱ्या अमित मिश्राला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
जागतीक क्रिकेट मधील सर्वोत्तम गोलंदाज अशी ख्याती असलेला जसमीत बुमराह हा मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज आहे. अनेक सामन्यात त्याने निर्णायक वेळी गोलंदाजी करत विजय खेचुन आणला आहे. मात्र दिल्ली विरुद्धच्या सामन्यात बुमराहने महत्वाच्या वेळी २ नो बॉल टाकल्यामुळे धावा आणि चेंडु दोन्हीतील अतंर कमी झाले. यामुळे दिल्लीचा विजय सोपा झाला. बुमराहने १९व्या षटकात २ नो बॉल टाकले, त्याचा लाभ दिल्ली कॅपीटल्सला झाला.
हे दोन नो बॉल टाकल्यामुळे बुमराहच्या नावे आयपीएलमध्ये एकुण २५ नो बॉल झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीशांत आहे. त्याने आयपीएलमध्ये एकूण २३ नो बॉल टाकले आहेत. याशिवाय अमित मिश्राने (२१), इशांत शर्माने (२१) आणि उमेश यादवने (१९) नो बॉल फेकल्याची नोंद आहे.
महत्वाच्या बातम्या
- ना पालखी ना सोहळा; लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राम जन्मोत्सव होणार घरातच
- पोलार्डमुळे रोहित शर्माला बसला १२ लाख रुपयांचा दंड
- पराभवानंतर गुणतालीकेत स्थान न गमावता मुंबई इंडियन्सला बसला ‘असाही’ फटका
- मुंबई इंडियन्सला पुन्हा भोवले फलंदाजाचे अपयश; दिल्लीपुढे ठेवले माफक आव्हान
- सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित मैदानात नसल्याचे खरे कारण आले समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
