Share

आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने केली पहिल्यांदा ‘अशी’ हॅटट्रिक

Published On: 

चेन्नई : आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात बेंगलूरु रॉयल्स चॅलेंजर्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा ३८ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच विराट कोहलीच्या आरसीबी संघाने विजयाची हॅटट्रिक केली. आतापर्यंतच्या झालेल्या आरसीबीच्या संघाने एकही सामना गमावला नाहीए, त्यामुळे आरसीबी हा संघ अद्याप अजिंक्य आहे.

या सामन्यात विजय मिळवत आरसीबीने सलग तिसरा सामना जिंकला आहे. आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात आरसीबीने प्रथमच स्पर्धेतील सलामीचे तीनही सामने सलग जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. आरसीबीने दिलेल्या २०५ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ १६६ धावापर्यंत मजल मारु शकला.

यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर तीन गडी राखून विजय मिळवला होता. तर, दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांना ६ धावांनी विजय मिळवला होता. तर रविवारी झालेल्या सामन्यात केकेआरचा ३८ धावांनी पराभव करत आरसीबीने आयपीएलच्या १४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच हंगामातील पहिले तिन्ही सामने जिंकण्याची कामगिरी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!