🕒 1 min read
मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच आता कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतासह महाराष्ट्रात विविध उपाययोजना करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांची दमछाक होत आहे. भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असून नव्या कोरोनाबाधितांचा आकडा दररोज नवनवे विक्रम गाठताना दिसत आहे.
यामुळे अनेक राज्यांमध्ये आरोग्य सुविधांवर ताण वाढत असून बेड्स, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचं मत शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच, कोरोनाच्या अभूतपूर्व स्थितीवर चर्चेसाठी संसदेचं दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी देखील राऊत यांनी केली आहे.
It's an unprecedented & almost a war like situation. Utmost confusion & tension everywhere!
No beds,no oxygen & no vaccination as well ! It's nothing but TOTAL CHAOS !
A Spl session of the Parliament for atleast 2 days should be called to discuss the situation!
जय हिंद! pic.twitter.com/c5rWbhyTD0— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2021
‘ही एक अभूतपूर्व आणि जवळजवळ युद्धासारखी परिस्थिती आहे. सगळीकडे अत्यंत गोंधळ आणि तणाव! बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसीकरण देखील नाही! हा सर्व गोंधळ असून या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यासाठी किमान दोन दिवस संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं जावं, जय हिंद !’ अशी मागणी संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
- श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरनवर चेन्नईत करण्यात आली अँजिओप्लास्टी
- ‘गोकुळ’मध्ये महाडिक गटाचा राष्ट्रवादीला धक्का; एकमेव संचालकाचा सत्ताधारी गटात प्रवेश
- ब्रेक द चेन! जालना जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंतच किराणा, भाजीपाला विक्री
- ‘या’ राज्यांमधून महाराष्ट्रात प्रवेश करायचा असल्यास RTPCR चाचणी बंधनकारक !
- देशात लसींचा तुटवडा नाहीच; अमित शाह यांचा दावा

