Share

विनाकारण फिरणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी परभणी पोलिसांच्या मदतीसाठी ड्रोन कॅमेरे

Published On: 

परभणी : शहरासह जिल्ह्यातील पोलिसांच्या बंदोबस्ताचे व्यवस्थापन व पोलिस कारवाईस गती मिळावी या दृष्टीने जिल्हा पोलिस प्रशासनाने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीने नजर ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नागरिकांवर पोलिसांना तात्काळ कारवाईस मोठी मदत होणार आहे. यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूच्या कहर खुप मोठया प्रमाणात वाढत चालला आहे. तर आता संचारबंदी असुन देखील नागरिक या – ना – त्या कारणासाठी बाहेर फिरताना आठळून येत आहेत. त्यामुळे कोराना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. घराच्या बाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलिसांसह आरोग्य, पोलिस कर्मचारी, अधिकारी खुप मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. परंतू संचारबंदीच्या काळामध्ये कोराेना रुग्ण कमी करण्याचे आव्हान तर आहे. त्यामुळे पोलिसांच्या मदतीसाठी हे ड्रोन सोबत असणार आहेत.

लॉकडाऊन, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ब्रेक द चेन संदर्भात निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २३ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन देखील जाहीर केला आहे. या स्थितीत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होवू नये तसेच कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या दृष्टीने पोलिसदलाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. तर शासनाने लावलेल्या नियमांचे उल्लंघन करणाराविरुद्ध पोलिसांनी कारवाईचे सत्र देखील सुरु केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!