Share

‘कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आलीय’

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : पंढरपूरमध्ये सध्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या मतदारसंघावर विजय मिळवण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी ठाण मांडला आहे. मतदान अवघ्या काही दिवसांवर आल्याने प्रचारसभांसह राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या आकस्मिक निधनाने रिक्त झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्यामूळे निवडणूकीच्या रणधुमाळीची चुरस वाढली आहे. या निवडणूकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगरिथ भालके यांना तर भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

आता भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे मैदानात उतरले आहेत. ‘महाराष्ट्र कोरोनाच्या संकटातून जात आहे. या संकटकाळात जनतेच्या जीवाची पर्वा न करता केवळ आणि केवळ राजकारण कोण करतंय, हे पंढरपूर मंगळवेढ्याचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. अशा प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधी निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढ्यातील सूज्ञ मतदारांना मिळाली आहे. भारतनानांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगीरथदादांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहा’ असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!