🕒 1 min read
कोलकाता : देशात दररोज कोरोना रुग्णांची वाढती संख्या भीषण समस्या निर्माण करत आहे. यामध्ये आणखी समस्या निर्माण झाल्या आहेत त्या अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे 2020 प्रमाणे याही वर्षी देशातकोरोनाने हाहाकार माजवला आहे. किंबहुना मागच्या वर्षीच्या तुलनेत कोरोना हा गंभीररित्या वेगानं देशात पसरत आहे.
दुसरीकडे देशातील पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. यामध्ये राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहेत. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी भाजपा वर गंभीर आरोप केला आहे.
‘आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं मात्र भाजपामुळे संसर्ग पुन्हा वाढला’ असं म्हणत ममतांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाने प्रचारासाठी बाहेरील राज्यांतून माणसं आणल्यामुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असा आरोप आता ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
Narendra Modi and Amit Shah didn't come here when COVID19 broke out. Now they have brought people here from outside and are escaping after spreading COVID19: West Bengal CM Mamata Banerjee in Jalpaiguri, earlier today pic.twitter.com/kDrH1ByJvw
— ANI (@ANI) April 14, 2021
एका प्रचारसभेत ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ‘लसीकरणासंदर्भातील अनेक राज्यांच्या विनंतीला केंद्र सरकार प्रतिसाद देत नाही. नागरिकांचे लसीकरण केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.’ ‘काही दिवसांपूर्वी आम्ही कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र, भाजपाने पश्चिम बंगालमध्ये प्रचार करण्यासाठी बाहेरील राज्यांतून माणसं बोलावली होती आणि त्यामुळे येथील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे’ असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- पराभवानंतरही हैदराबादचा कर्णधार वॉर्नरचा मोठा विक्रम; गब्बर आणि हिटमॅनला टाकले मागे
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

