Share

गेवराईत नगरपालिकेत लसीकरणाचा शुभारंभ; आ. पवारांच्या उपस्थितीत उद्घाटन

Published On: 

🕒 1 min read

बीड: राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे, तसेच रुग्णसंख्येची वाढ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी शासन तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना करत आहेत. याच सोबत लसीकरण मोहीम सुद्धा देशभरात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे, नागरिकांचा देखील याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर गेवराई येथे नगरपालिकेत लसीकरण गुरुवार पासून सुरु होणार आहे.

आमदार लक्षमण पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांनी दिली आहे. कोरोनो नावांच्या विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे गेवराई नगरपालिकेत लसीकरण केंद्र सुरू होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांनी दिली आहे.

कोरोनाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी व नगरपालिका यांच्या माध्यमातून गेवराई नगरपालिकेत गुरुवार, दि. १५ एप्रिलपासून लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. आमदार लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी १० वाजेपासून नगरपालिका सभागृहात लसीकरण केंद्राला सुरुवात होणार आहे तरी ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष सुशील जवंजाळ यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!