मुंबई : देशासह कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच, येत्या काळात अनेक राज्यात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान अनेक राजकीय नेते, कलाकार मंडळी, यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये नुकतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
आज पुन्हा माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत.माझी प्रकृती उत्तम असून सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) April 14, 2021
राज्यात देखील भाजप नेते आशिष शेलार यांना करोनाची लागण झाली आहे. तर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. श्रीकांत शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे ‘आज पुन्हा माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू आहेत. माझी प्रकृती उत्तम असून सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर होईन. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी. लक्षणं दिसल्यास तात्काळ करोना चाचणी करावी’.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृती उत्तम आहे.आपणा सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी योग्य काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) March 1, 2021
अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे. याआधी १ मार्चला श्रीकांत शिंदे यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. महिन्याभरानंतरच त्यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- पराभवानंतरही हैदराबादचा कर्णधार वॉर्नरचा मोठा विक्रम; गब्बर आणि हिटमॅनला टाकले मागे
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही

