नवी दिल्ली- कोविड-19 आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व राज्यपालांनी आपापल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सक्रीय सहकार्य करावं, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केलं आहे.काल नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना सद्यस्थिती आणि लसीकरण अभियान या अनुषंगानं कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विचार मंथन केलं, त्यामध्ये नायडू बोलत होते.
देशातील कोविड-19 च्या रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीबाबत चिंता व्यक्त करताना नायडू म्हणाले की यामुळे देशातील आरोग्य सेवा पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडत आहे. मागील 14 दिवसांत राष्ट्रीय रुग्णसंख्येत 85 टक्के आणि 89 टक्के मृत्यू झालेल्या 10 राज्यांकडे विशेष लक्ष देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.
हे आव्हान खूपच चिंताजनक आहे हे ओळखून उपराष्ट्रपती म्हणाले की, मागील वर्षाच्या तुलनेत आज आम्ही याचा सामना करण्यासाठी योग्य प्रकारे सज्ज आहोत कारण देशाने मागील एक वर्षाच्या कालावधीत पायाभूत सुविधांची अनेक कामे केली आहेत. “आता आपल्याकडे सुरक्षित आणि प्रभावी लसी आहेत,” असे ते म्हणाले.
प्रत्येक राज्यपाल हा त्या राज्याचा घटनात्मक प्रमुख असल्याने या महामारी विरुद्धच्या लढाईत प्रत्येक राज्यपालांची भूमिका ही महत्वपूर्ण असल्याचे नमूद करत नायडू यांनी राज्यपालांना संबधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सक्रियपणे सहकार्य करण्यास सांगितले. “आपण केवळ आपला अनुभव आणि कौशल्याच सामायिक करू नका तर राज्य सरकारांना अधिक प्रभावी रणनीती तयार करण्यासाठी मार्गदर्शन देखील करू शकता,” असे त्यांनी राज्यपालांना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- पराभवानंतरही हैदराबादचा कर्णधार वॉर्नरचा मोठा विक्रम; गब्बर आणि हिटमॅनला टाकले मागे
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही


