जालना: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले, असून दुसरी लाट एवढी भयावह आहे की बाधित रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात बेड मिळेना, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूही होत असून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा लागत आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी रात्री ८ वाजेपासून पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली असून स्थानिक प्रशासनाने याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
सध्या जिल्ह्यात ६ हजार ५१३ ऍक्टिव्ह रुग्ण असून हॉटस्पॉटची संख्या ११६ वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान, कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून हॉटस्पॉटच्या बाहेर संसर्ग वाढू नये, यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या त्रिसूत्रीनुसार आराेग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
जालना शहरासह जिल्ह्यात मंगळवारी ८६४ एवढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, वर्ष २०२० मध्ये सर्वाधिक २६६ रुग्ण ९ ऑक्टोबर रोजी आढळून आले होते. चालू वर्षात फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून बाधितांची संख्या उत्तरोत्तर वेगाने वाढतच चालली आहे. दुसरीकडे मृत्युसत्रही थांबायला तयार नाही.
महत्वाच्या बातम्या
- मरण झाले स्वस्त! उस्मानाबादेत एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंतिम संस्कार
- पराभव पचविणे अवघड आहे ; खराब फलंदाजीमुळे सामना गमावला : वॉर्नर
- पराभवानंतरही हैदराबादचा कर्णधार वॉर्नरचा मोठा विक्रम; गब्बर आणि हिटमॅनला टाकले मागे
- विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली
- विराट कोहली पुन्हा भडकला; रागाच्या भरात कोहलीने केले असे काही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

