Share

अखेर राहुल गांधीं बंगालमध्ये प्रकटले ; पहिल्याच सभेत मोदी, ममतादीदींवर घणाघात

Published On: 

🕒 1 min read

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजप आणि तृणमूल यांच्यात जोरदार घमासान सुरु आहे. निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.

अशातच आता बंगालमधील चार टप्प्यांसाठी मतदान झाल्यावर आणि पाचव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालच्या प्रचारात एन्ट्री घेतली आहे. बंगालमधील या पहिल्याच प्रचार सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

उत्तर बंगालमधील गोलपोखर येथून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये आग लावत आहे. तर ममता बॅनर्जी या त्या आगीशी खेळ खेळत आहेत. राज्याचा काहीच विकास झाला नाही. आम्ही भाजपशी कोणतीही तडजोड केलेली नाही. आमची आरएसएससोबत वैचारिक लढाई आहे. त्यांच्या विचारधारेने गांधींजींची हत्या केली आहे. त्या विचारधारेच्या विरोधात आम्ही लढत आहोत. आम्ही जीव देऊ, पण विचारापासून तसूभर मागे हटणार नाही, असं सांगतानाच मोदींनी काँग्रेसमुक्त भारत म्हटलं. पण तृणमूल मुक्त नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजप आणि टीएमसी यांच्यात फिक्सिंग असल्याचे संकेतच दिले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ पैकी चार टप्प्यातील मतदान नुकतचं पार पडलं. जसजसे मतदानाचे टप्पे पुढे जात आहेत तसा इथला प्रचार चांगलाच रंगात आला आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या    

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!