Share

ऐकावे ते नवलच! बायको झुरळाला घाबरते म्हणून नवऱ्याने मागितला घटस्फोट

Published On: 

भोपाळ : पती पत्नीचा घटस्फोट होण्याची अनेक कारणे असतात. स्वभाव न पटने, वैचारिक मतभेद, विवाहबाह्य संबंध यासारख्या कारणांमुळे घटस्फोट होणे साहजिक आहे. परंतू मध्य प्रदेशमध्ये एका विचित्र कारणामुळे पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. आपली बायकोच्या झुरळाला घाबरते. याला वैतागून पतीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. यावर पत्नीनेही पतीविरोधात तक्रारीचा पाढा वाचला आहे. तिचे म्हणणं आहे की, नवरा तिच्या समस्येला नीट समजूनच घेत नाहीये. तिला फक्त झुरळाची भीती वाटते. पण पती मला वेडसर ठरवण्याच्या प्रयत्नात आहे.

पतीने कोर्टाला सांगितले की, बायको झुरळाला खूप घाबरते. विवाहानंतर तीन वर्षांत त्याला या कारणामुळे अठरा वेळा घर बदलावे लागले. पण बायकोची भीती कमी झाली. बायकोच्या या ‘झुरळ फोबिया’ची त्याला २०१८ मध्ये समजले. बायको स्वयंपाकघरात काम करताना तिला तिथे झुरळ दिसले. ती ओरडत बाहेर आली. पण त्यानंतर तिने त्या किचनमध्ये कधीच पाऊल टाकले नाही. झुरळ मारण्याचे सर्व प्रयोग केले. घरातून झुरळांचा नायनाट झाला. पण बायकोने स्वयंपाकघरात जाण्यास नकार दिला. अखेर त्याने ते घरचं बदलले.

दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर झुरळ पाहताच बायको इतक्या मोठ्याने ओरडते की कुटुंबातील इतर जण देखील घाबरतात. घरात झुरळ दिसले की बायको घर बदलायला भाग पाडते. तिच्यामुळे अठरा घरे बदलावी लागलीत. त्यामुळे माझी सर्वत्र चेष्टा होत असल्याचे दु:ख नवऱ्याने व्यक्त केले. तिची भीती दूर व्हावी म्हणून अनेक डॉक्टरांकडे तिला उपचारासाठी दाखवण्यात आले. दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमधील मनोविकार तज्ज्ञांकडूनही तिच्यावर उपचार केले. पण तिच्यात काही फरक पडला नाही. त्यामुळे अखेर पतीने थेट घटस्फोटासाठीच अर्ज केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!