Share

विवाहित पुरुषासाठी वेडं झालेलं पाहिलं आहे का?, रेखा यांनी दिल भन्नाट उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अदाकार रेखा यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. शनिवारी प्रसारित झालेल्या या एपिसोडमध्ये रेखा यांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक मजेदार आठवणी शेअर केले. पण जिथे रेखा असतील तिथे अमिताभ बच्चन यांची चर्चा तर होणारच.  याची प्रचिती पुन्हा एकदा इंडियन आयडॉलच्या मंचावर आली. शनिवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अनेकदा अमिताभ बच्चन यांचं नाव न घेता त्याची आठवण काढण्यात आली.

सर्वात आधी एपिसोडच्या सुरुवातीला जेव्हा होस्ट जय भानुशालीनं नेहा कक्कर आणि रेखा यांना विचारलं, कधी तुम्ही कोणत्या महिलेला एवढं वेडं झालेलं पाहिलं आहे का? आणि तेही विवाहित पुरुषासाठी? जयचं बोलणं पूर्ण होतं ना होतं तोच रेखा म्हणाल्या ‘मला विचारा ना.’ रेखा यांचं बोलणं ऐकल्यानंतर मंचावरील प्रत्येकजण हैराण झाला होता. पण मग सर्वांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर रेखा यांनी लगेचच बोलणं बदलत म्हटलं, ‘मी काहीच नाही बोलले.’ पण त्यांचा हा रोख अमिताभ बच्चन यांच्याकडेच होता हे काही वेगळं सांगायला नको.

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. रेखा यांच हा व्हिडीओ सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. सध्या या व्हिडीओमुळे सोशलवर जोरदार चर्चा चालू आहे. या व्हिडीओवरती सध्या जोरदार कॉमेंट्स येत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!