मुंबई : येत्या ९ एप्रिल पासून आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. सर्व संघाचे सराव शिबीर सुरु झाले असुन खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. यादरम्यान संघाची बांधणी करण्यासाठी उपलब्ध खेळाडूंची यादी बनवण्याचे काम संघ व्यवस्थापन करत आहे. यात काही खेळाडू दुखापतीमुळे खेळु शकणार नसतील तर त्यांना पर्याय शोधायला सुरुवात झाली आहे.
याच प्रक्रियेचा भाग म्हणून यंदाच्या आयपीएल लिलावात एका खेळाडुला कोणीही खरेदीदार मिळाला नव्हता. मात्र आता सनरायझर्स हैदराबाद संघाचा प्रमुख खेळाडू मिशेल मार्शने स्पर्धेतून माघार घेतल्याने त्या खेळाडूचा हैदराबादच्या संघात समावेश करण्यात आला आहे. तो खेळाडू म्हणजे जेसन रॉय. मागील वर्षी दिल्ली संघाचा सदस्य असलेल्या जेसन रॉयने वैयक्तीक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली होती.
हैदराबाद संघाकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मिशेल मार्शने मोठ्या कालावधीसाठी बायोबबलमध्ये राहाणे कठीण असल्याच्या कारणाने अगामी आयपीएल हंगामातून माघार घेतली आहे. मार्श दुखापतीमुळे मागचा हंगामही तो पूर्ण खेळू शकला नव्हता. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला हैदराबादने मार्शचा बदली खेळाडू म्हणून हैदराबादने आगामी आयपीएल हंगामासाठी संघात स्थान दिले आहे. रॉयने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १ अर्धशतकासह १७९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पालकमंत्र्यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
- ‘नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली पण ‘ती’ घोडचूक कधी सुधारणार ?’
- दोन हजाराची लाच मागणारा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात!
- …म्हणून प्राजक्ता नंतर आता वीणा जगतापने सोडली ‘आई माझी काळुबाई’ मालिका
- कोरोना उपचार केंद्रांची संरचनात्मक व अग्निप्रतिबंधात्मक तपासणी; खाटांची संख्या वाढणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
