औरंगाबाद : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, कोरोना लसीने आशादायी चित्र निर्माण केले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी कोरोना लसींचा साठा संपला होता. महापालिकेने शासनाकडे तात्काळ दहा हजार लसींचा पुरवठा करण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार दहा हजार लसींचा पुरवठा शुक्रवारी (दि.२६) प्राप्त झाला. यातून एक लाख नागरिकांना लसीकरण करता येईल, अशी माहिती पालिकेचे प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी दिली.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार औरंगाबाद शहरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. आजवर सुमारे ८७,२७० नागरिकांना लसीकरण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून पालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्र व दवाखान्यांतून नागरिकांना लस दिली जाते. मात्र मागील दोन दिवसांपासून पालिकेत कमी प्रमाणात लस होत्या.
याबाबत प्रभारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर यांनी पालिकेने शासनाकडे लसीची मागणी नोंदवली असल्याचे गुरूवारी स्पष्ट केले होते. मात्र गुरूवारी रात्रीपर्यंत पालिकेला लसींचा पुरवठा प्राप्त झालेला नव्हता. दरम्यान, बुधवारी पालिकेकडे केवळ ३५०० लसींचा साठा होता. त्यातील दीड ते दोन हजार लसींचा वापर गुरुवारी करण्यात आला.
पालिकेने दहा हजार लसींचा साठा देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळीच दहा हजार लसी प्राप्त झाल्या आणि पालिकेला दिलासा मिळाला. रोजचे दोन हजार लसींतून वीस हजार नागरिकांना लसीकरण करता येते. त्यानुसार या दहा हजार लसींतून एक लाख जणांचे लसीकरण करता येईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- जागतिक रंगभूमी दिन! शहर ‘लॉक’ अन नाटके ‘डाऊन’
- एनआयएच्या चौकशीमुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत ; फडणवीसांचा टोला
- दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डीला अटक का केली नाही ? फक्त थातुरमातुर बदलीचे नाटक का ?
- विजयासाठी ममता बॅनर्जींनी मागितली भाजपाच्या नेत्याला मदत
- आयुक्तांच्या ‘त्या’ पोस्टवरून खळबळ! आखिर कहेना क्या चाहते थे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
