🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग शहरात गतीने पसरत आहे. सर्वत्र लॉकडाऊनच्या अफवा उडालेल्या आहेत. अनेकांची लॉकडाऊनच्या अफवेने भीतीने गाळण उडाली आहे. आज लॉकडाऊन होईल का उद्या, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी काल रात्री फेसबुक वर शेअर केलेल्या पोस्टने सर्वत्र चर्चेचा धुरळा उठला आहे. सर्व प्रतिक्रियांमधून ‘आखिर कहेना क्या चाहते हो’ असा सूर होता. सकाळ झाली आणि रात्रीची पोस्ट डिलिटही झाली. पण प्रश्न कायम आहे, ‘आखिर कहेना क्या चाहते थे’ ?
शहरात दररोज दिड हजारांवर रुग्ण निघत आहेत. मात्र त्या तुलनेत आरोग्य सुविधा पुरवणारी यंत्रणाच कोलमडल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण शहरभर बोंबलत फिरतांना दिसत आहेत. सध्या सौम्य लक्षणे असणारे ३७८५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र या सर्वांवर कोणाचाही अंकुश नसल्याने कोरोना संसर्गाचा शहरात गतीने फैलाव होतांना दिसत आहे. बेड्सची संख्या वाढवूनही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या परिस्थितीत काल लाईव्ह आलेल्या जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी देखील लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
मात्र काल रात्री १२ वाजता मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या एका फेसबुक पोस्टने लॉकडाऊनच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. पहिल्या पोस्टमध्ये ‘I’ आणी दुसऱ्या पोस्टमध्ये त्या जागी ‘We’ करण्यात आले. पण मूळ महत्वाचा गाभा तसाच होता. यात ते म्हणतात , कोरोनाच्या गतीने होणाऱ्या फैलावास औरंगाबाद शहराचे नागरिक म्हणून आपणच जबाबदार आहोत.
त्यामुळे येत्या काळात मी काही कठोर निर्णय घेणार आहे. मित्रांनो यात मला मदत करा. त्यांच्या या खळबळजनक पोस्टवर शहरातील नागरिक चांगलेच पेटून उठले. आम्हांला लॉकडाऊन नको आहे. कृपया असा निर्णय घेऊ नका अशा स्वरुपाच्या अनेक कमेंट्सचा त्यावर वर्षाव झाला. मात्र होत असलेला विरोध आणि या पोस्ट वरुन सुरु झालेल्या तर्क वितर्कांनंतर त्यांना हि पोस्ट डिलीट करणे भाग पडले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ज्यांचे चित्रपट कधी चालले नाहीत त्यांना कोव्हिड सेंटरचे कंत्राट दिले’
- UPA अध्यक्षपदाच्या वाद; आणखी एका कॉंग्रेसच्या नेत्याने राऊतांना सुनावले खडेबोल
- सोमवारपासून संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता!लोक
- ‘सोनिया गांधी याच आमच्या नेत्या’ ; UPA अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत वाद
- पंढरपूरची लढाई महाविकास आघाडीसाठी वाटते तेवढी सोपी नाही ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
