Share

जागतिक रंगभूमी दिन! शहर ‘लॉक’ अन नाटके ‘डाऊन’

Published On: 

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराची पर्यटननगरी बरोबरच नाटकासाठी सुद्धा एक वेगळी ओळख आहे. कितीतरी मोठे नट या शहराने घडवले आहेत. मात्र गेली कित्येक महिने कलाप्रेमी औरंगाबादकर आणि नाटकवेडे कलावंत रंगमंचापासून दूर आहेत. हि रंगभूमी आपल्या लेकरांची, कलाकारांची, प्रेक्षकांची वाट पाहत आहे.

कोरोनाने सर्व काही ठप्प केले आहे आणि सतत बागडणारी, हसणारी रंगभूमी देखील आता भकास आणि शांत झाली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोनाने सर्वत्र आपले पाय पसरवायला सुरुवात केली. आणि हळूहळू सर्व गोष्टींवर बंधने आली. काही कालावधीनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत गेली. ५ नोव्हेंबर पासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे उघडली.

मात्र कोरोनाच्या भितीने या रंगमंचाला बहरायला पुरेसा वेळही मिळाला नाही आणि पुन्हा एकदा शहरावर कोरोनाची छाया आता गडद झाली आहे. शहरावर लॉकडाऊन नावाचे वादळ घोंगावतांना दिसत आहे. मात्र अजूनही कलाकारांचे गतवर्षी सुरु झालेले ‘लॉकडाऊन’ अजूनही संपलेले नाही.

कलाकार जगला तरच रंगभूमी जिवंत राहिल

गतवर्षी कोरोना सुरु होण्याच्या आठ दिवस आधी आमच्या नाट्यवल्ली संस्थेचा शेवटचा प्रयोग झाला. आणि त्यानंतर आजपर्यंत आम्ही एकही प्रयोग रंगमंचावर सादर करु शकलेलो नाही. आज परिस्थिती चांगली होईल कदाचित उद्या होईल हा विचार करता करता वर्ष निघून गेले. आपल्या शहरात खूप हरहुन्नरी कलाकार आहेत. पडद्यामागे काम करणारे कित्येक कलाकार अजूनही फोन करुन नाटक कधी होणार याविषयी विचारणा करतात. तेव्हा आम्ही यांच्यासाठी काही ही करु शकत नसल्याचे मोठे दु:ख होते. औरंगाबाद प्रशासनाने नाटकांचा, शहराच्या करमणुकीचा आणि विरंगुळ्याचा विचार करुन अटी शर्तींसह नाटकांना, चित्रपटांना परवानगी द्यायला हवी. तर कलाकार जगु शकेल. कलाकार जगवला तरच रंगभूमी जिवंत राहिल.

– प्रांजल हुसे,नाट्यवल्ली नाट्यसंस्था

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!