🕒 1 min read
पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दुसऱ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारतीय संघाचा ६ गडी राखुन पराभव केला. या विजयानंतर इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधत पुनरागमन केले आहे. दुसऱ्या सामन्यात जरी भारताचा पराभव झाला असला तरी या मालिकेत भारतासाठी एक चांगली गोष्ट घडत आहे. ती म्हणजे फलंदाजी दोन्ही सामन्यात भारताने ३०० पेक्षा जास्त धावांचा पल्ला ओलांडला आहे. ही भारतीय संघासाठी सकारात्मक बाब राहिली आहे.
महत्वाचे म्हणजे या दोन्ही सामन्यात भारताची सुरुवात चांगली झाली नव्हती. पहिला गडी दोन्ही सामन्यात भारताने स्वस्तात गमावला होता. दोन्ही सामन्यात भारताची सुरुवातही संथच झाली होती. मात्र तरिही भारताने डावा आखेर ३०० धावांचा पल्ला पार केला होता. यामागे महत्वाचे कारण आहे आखेरच्या १० षटकातील भारतीय फलंदाजी. पहिल्या सामन्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजानी आखेरच्या दहा षटकात ११२ धावा केल्या होत्या आणि याच ११२ धावांच्या सहाय्याने भारताने इंग्लंडसमोर ३१७ धावांचा डोंगर उभा केला होता.
तर दुसऱ्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३६ धावांचा डोगंर उभा केला होता. मात्र या सामन्यातही भारताचे दोन्ही सलामीवीर धवन (४) आणि रोहित (२५) धावा करुन तंबुत माघारी परतले. २ बाद ३७ अशी अवस्था असताना भारताने डावाआखेर ३३६ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात के. एल. राहुलने शानदार शतक झळकावले. तर कर्णधार कोहली आणि रिषभ पंत यांनी अर्धशतके झळकावली. या सामन्यातही भारतीय फलंदाजानी डावाच्या आखेरच्या षटकात १२६ धावा केल्या त्यामुळे भारताला ३३६ धावांचा डोंगर उभा करता आला.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे सामना आमच्या हातातून निसटला : विराट कोहली
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- …म्हणून पांड्याला बॉलिंग नाकारली कोहलीने सांगितले कारण
- ‘आणखी किती फेकाल मोदी जी, मराठीत एक लाईन आहे… हद झाली राव’
- अवैध दारू विक्री निदर्शनास आणून द्या, एक वर्ष करापासून मुक्ती मिळावा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
