Share

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रसासनाद्वारे सनियंत्रण अधिकार्‍यांची नियुक्ती

Published On: 

परभणी : कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात असलेल्या कोविड सेंटरवरील व्यवस्थापनासह ऑक्सीजनसह आदी बाबात तातडीने निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सनियंत्रण अधिकार्‍यांची नियुक्ती करीत कामाच्या जबाबदारीचे आदेश सोमवारी दिले आहेत.

यात रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जर्‍हाड, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) बी.एच. बिबे, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) निवृत्ती गायकवाड यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.आय.ओ. सुनील पोटेकर, नायब तहसीलदार रामदास कोलगणे, तहसीलदार सुरेखा नांदे, नायब तहसीलदार अशोक मिरगे, तहसीलदार संजय बिरादार यांच्यासह नायब तहसीलदार वंदना मस्के यांची नियुक्ती केली आहे. 

दरम्यान नायब तहसीलदार दळवे, कैलास वाघमारे, शीतल कच्छवे, मीनाक्षी तमन्ना, श्रीरंग कदम, माधव वडजे, हरीश टाक आदींवर शहरातील कोविड सेंटरवर देखरेखीसह तेथील  रुग्णांना लागणार्‍या ऑक्सीजनची व्यवस्था, पुरवठा, लसीकरण, आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवालासह चाचण्या करून घेण्याची जबाबदारी, वॉर रुम, हॉस्पिटल व्यवस्थापन, कोविड सेंटरच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!