Share

फेरफारासाठी लाच स्वीकारणारा मंडळ अधिकारी, सरपंच अटकेत

Published On: 

परभणी : न्यायालयाकडून झालेल्या तडजोडीचा फेरफार वडील व काकाच्या नावे लावण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या मंडळ अधिकार्‍यासह सरपंचास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी  रंगेहात पकडले.

गंगाखेड तालुक्यातील वाघदरा शिवारातील आजोबांच्या नावाने असलेल्या जमिनीचा न्यायालयाकडून झालेल्या तडजोडीचा फेरफार आपले वडील व काकाच्या नावे लावून द्यावा, अशी विनंती राणीसावरगाव येथील मंडळ अधिकारी बालाजी संभाजी लटपटे यांच्याकडे तक्रारदाराने केली होती. मात्र, मंडळ अधिकारी लटपटे यांनी याबाबत प्रतिसाद न देता वाघदरा येथील सरपंच गोविंद दत्तराव सानप यांच्यामार्फत फेरफार करण्यासाठी 15 हजार रुपये लागतील, असा निरोप देत लाचेची मागणी केली होती. मात्र, तक्रारदारास लाच देणे योग्य वाटत नसल्याने त्यांनी परभणी येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक भरत हुंबे व पोलिस निरीक्षक अमोल कडू यांच्याकडे मंडळ अधिकार्‍याविरूध्द तक्रार केली आहे.

पथकाने सोमवारी लटलटे यांच्या निवासस्थानी गंगाखेड येथे सापळा लावला. तक्रारदार यांचे वाघदरा शिवारातील त्यांचे आजोबाच्या नावाने असलेला जमिनीचा न्यायालयाकडून झालेला तडजोडीचा फेरफार त्यांचे वडीलांचे व काकाच्या नावे लावण्यासाठी मंडळ अधिकारी बालाजी लटपटे, सरपंच गोविंद सानप यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांच्याकडून तडजोडीनंतर 12 हजार 500 रुपये बालाजी लटपटे यांच्या गंगाखेडातील व्यंकटेशनरातील निवासस्थानी सरपंच गोविंद सानप  मार्फत स्वीकारले. लाचेच्या रकमेसह दोघांनाही लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्यावर गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!