Share

‘नितीन राऊत लॅविश रहा, मात्र करोडोंचा खर्च स्वतः केला की सरकारी तिजोरीतून केला हे सांगा’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सर्वसामान्य जनता करोनाच्या निर्बंधांबरोबर वाढत्या महागाईला तोंड देत असताना थकीत विज बिलासाठी मदत मिळेल अशी आशा सरकारने दाखवली. मात्र, त्यावर सरकारने घोर निराशाच केली. काही हप्ते करून विजबील भरण्यास मुभा देणे गरजेचे असताना थेट कनेक्शन कट केलं जात आहे. तर दुसरीकडे मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपने केला होता.

यावर आता उर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबतचं स्पष्टीकरण दिलेले आहे. ते म्हणाले कि, ‘मला चांगले रहायला आवडते, माणसाने लॅविश राहू नये का? मी कोणतेही नियमबाह्य काम केलं नसून गेले वर्षभर मी भाड्याच्या घरी राहत होतो.’

पुढे ते म्हणाले, ‘माझा जन्म जरी गरीब घरात झाला तरी मी पायलट होतो. त्यावेळीही मी खर्च करु शकत असल्याने असाच रहायचो. मला चांगलं राहायला आवडतं. आताही मी नियमबाह्य कोणतीही गोष्ट केली नाही. तर, सार्वजनिक बांधकाम विभाग नियमांच्या अधिन राहून जे काम करत, ते काम सुरू आहे.’ असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

नितीन राऊत यांच्या या स्पष्टीकरणावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी भाष्य करत हा खर्च स्वतःच्या खिशातून आहे की सरकारी तिजोरीतून होत आहे ? असा सवाल केला आहे. ‘मी पायलट होतो त्यावेळी मी खर्च करु शकत असल्याने लॅविश रहायचो असं उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले… हरकत नाही पण आत्ता हा करोडोंचा खर्च तुम्ही खिशातून केलात की सरकारी तिजोरीतून केलात एवढंच सांगा…’ असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!