Share

नाना पटोले यांची मंत्रिपदी वर्णी लागणार?, ‘या’ मंत्र्याचा होणार पत्ता कट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्यानंतर आता नवे विधानसभा अध्यक्ष कोण होणार यावर राजकीय विश्वात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ऊर्जा मंत्रीपद देण्यात येणार आहे अशी माहिती सध्या मिळत आहे.

राज्य सरकारमध्ये राजकीय भूकंपाची मालिका सुरुच आहे. संजय राठोड यांचा राजीनामा, मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यानंतर अजून एक मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. कारण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची माहिती मिळतेय.

नितीन राऊत यांच्याकडील ऊर्जा खात्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्लीज आज काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे बैठक होत आहेत.

विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं महत्त्व कमी न करता खातेबदल होण्याचे संकेत पूर्वीपासूनच मिळत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले होते.

राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी त्यावेळी दिली होती. त्यामुळे नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!